breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

#CoronaVirus: जगभरातील बळींची संख्या १६,९६१

करोना विषाणूने जगभरात घेतलेल्या बळींची संख्या आता १६,९६१ झाली आहे.  एकूण १७५ देशात ३,८६,३५० रुग्णांची नोंद झाली असून चीनमध्ये डिसेंबरमध्ये करोनाची सुरुवात झाली होती.

जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले आहे की, ही संख्या अजून जास्त असण्याची शक्यता आहे. अनेक देशात चाचण्या वेगाने सुरू आहेत. इटलीत आतापर्यंत चीनपेक्षा अधिक म्हणजे ६०७७ बळी गेले आहेत. त्याशिवाय तेथे ६३,९२७ जणांना संसर्ग झाला असून ७४३२ जण बरे झाले आहेत. चीनमध्ये ८१,१७१ रुग्ण असून ३२७७ जणांचा मृत्यू झाला आहे. ७३,१५९ लोक बरे झाले आहेत. एकूण ७८ नवीन रुग्ण सापडले असून सातजणांचा सोमवारी मृत्यू झाला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button