Uncategorized

आज जगाची नजर भारतावर ; नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला.

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नेटवर्कच्या ‘व्हॉट इंडिया थिंक्स टुडे’ परिषदेला हजेरी लावली. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाच्या प्रगतीचा आढावा घेतला. मोदी आपल्या संबोधनाच्या सुरूवातीला म्हणाले, आयएमएफचे नवीन आकडे समोर आले आहेत. ते आकडेच सांगतात की, भारत जगातील एकमेव मेजर इकोनॉमी आहे. ज्यांनी १० वर्षात आपल्या जीडीपीला डबल केलं आहे. मागच्या दशकात भारताने २ लाख कोटी डॉलर आपल्या इकोनॉमीत जोडले आहेत. जीडीपी डबल होणं म्हणजे केवळ आकडे बदलणे नाही. त्याचा इम्पॅक्ट पाहा. २५ कोटी लोक गरीबीतून बाहेर आले आहेत. आणि हे २५ कोटी लोक एक न्यूओ मिडल क्लासचा हिस्सा झाले. हा न्यूओ मिडल क्लास नवीन आयुष्य सुरू करत आहे.

हेही वाचा –  ‘कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरासाठी अर्थसंकल्पामध्ये पाचशे कोटींची तरतूद’; उपमुख्यमंत्री अजित पवार

यासह मोदी पुढे असेही म्हणाले की, आपण नव्या स्वप्नांना घेऊन जात आहे. आपल्या इकोनॉमीत योगदान देत आहे. त्याला व्हायब्रंट करत आहे. जगातील सर्वात जास्त तरुण आपल्या देशात आहे. हे तरुण स्किल्ड होत आहे. इनोव्हेशनला गती देत आहे. त्यामध्ये भारताच्या फॉरेन पॉलिसीचा मंत्र झाला इंडिया फर्स्ट. एकेकाळी भारताची पॉलिसी होती, सर्वांपासून समान अंतराव राहण्याची. आजच्या भारताची पॉलिसी आहे सर्वांसोबत जवळ जाऊन चला. सर्वांना सोबत घेऊन चला. जगातील देश भारताची ओपिनियन, भारताचे इनोव्हेशन आणि भारताच्या एफर्टला महत्त्व आज देत आहेत. तसं पूर्वी कधीच झालं नाही. आज जगाची नजर भारतावर असल्याचे मोदींनी म्हटले.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button