TOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमुंबई
सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार
मुंबई: एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे शिवसेना पक्ष खिळखिळा झाला असताना आता शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस खासदार संजय राऊत यांच्यासाठी मैदानात उतरणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेकडून संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या अटकेच्या निषेधार्थ सक्तवसुली संचलनालय अर्थात ईडीच्या दक्षिण मुंबईतील कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यात येणार आहे. त्यामुळे यानिमित्ताने ईडीच्या कार्यालयाबाहेरील वातावरण तापण्याची शक्यता आहे. ईडीने ही शक्यता लक्षात घेऊनच कालपासूनच कार्यालयाच्या परिसरात बॅरिकेडस लावून नाकांबदी केली होती. तसेच याठिकाणी सीआरपीएफच्या जवानांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.





