Uncategorizedताज्या घडामोडीपुणे

हडपसर सासवड रोड सातववाडी येथे मुलीला शाळेत घेऊन जात असताना दुचाकी घसरून मुलगी व वडील दोघेही टँकर खाली

  • पुण्यातील हडपसरमध्ये अपघात
  • हडपसर सासवड रोडवर अपघात
  • दोघांचा मृत्यू
हडपसर (पुणे) : हडपसर सासवड रोड सातववाडी येथे मुलीला शाळेत घेऊन जात असताना दुचाकी घसरून मुलगी व वडील दोघेही टँकर खाली आल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेत वडिलांचा जागेचा मृत्यू झाला तर मुलगी गंभीर जखमी असताना ती ” बाबा बाबा ” म्हणून ओरडत होती. नागरिकांनी तात्काळ तिला खासगी रुग्णालयात दाखल केलं, मात्र तो पर्यंत तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ही घटना सकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली, मुलीला शाळेत सोडत असताना बाप लेकीचा मृत्यू झाल्याची घटना क्षणभरात हडपसर परिसरात पसरली, घटनास्थळी हडपसर पोलीस व जीव रक्षक फाउंडेशनचे कार्यकर्त्यांनी मदत कार्य केले.
मीनाक्षी निखिल साळुंखे ( वय १० ), निखिल साळुंखे ( वय ३५ रा. ढमाळवाडी फुरसुंगी ) असे अपघातात मृत्यु झालेल्या वडील व मुलीचे नावं आहे. प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी सांगितल्यानुसार, निखिल साळुंखे यांची मुलगी मीनाक्षी ही साधना शाळेमध्ये इयत्ता पाचवी वर्गामध्ये शिकत होती. सकाळी सात वाजता शाळेला सोडायला वडील दुचाकीवरून जात असताना, सातववाडी येथे अपघात झाला.

कसा झाला अपघात?
सातववाडी येथे सायकल ट्रॅक शेजारी कचरा कुंडी आहे. या कचरा कुंडी शेजारून पुढे जाणाऱ्या दुचाकी स्वराने दुचाकी चालू अवस्थेत हातातील कचऱ्याची पिशवी कचराकुंडीत फेकली. त्यावेळी मागून येणारे निखिल साळुंखे गडबडले आणि चिखलावरून त्यांची दुचाकी घसरली, यामध्ये दोघेही बापलेकी पाठवून पाठीमागून येणाऱ्या टँकर खाली गेले, यामध्ये टँकरचे चाक वडिलांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागेचा मृत्यू झाला.तर मुलीचे डोके रस्त्यावर आपटल्याने ती गंभीर जखमी झाली होती, तिने वडिलांना पाहिले तेव्हा ती बाबा बाबा म्हणून ओरडली. तिला वाचवण्यासाठी नागरिकांनी तात्काळ तिला रुग्णाला दाखल केले मात्र तो पर्यंत तिचाही रुग्णालयात उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. बापलेकीचा मृत्यू झाल्याची घटना क्षणात हडपसर परिसरामध्ये पसरली. घटना स्थळी हडपसर पोलिसांनी धाव घेऊन घटनेची माहिती जात आहे घेतली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button