Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedमहाराष्ट्र

“सीमावादाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तोपर्यंत हा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा”; उद्धव ठाकरे

नागपूर :
नागपूर येथे सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनाचा आज पाचवा दिवस आहे. या अधिवेशनाला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकार गेल्यानंतर पहिल्यांदाच सभागृहात उपस्थित लावली. यावेळी त्यांनी कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादावरून सत्ताधारी पक्षावर टीकास्त्र सोडलं आहे.
जोपर्यंत सीमावादाचा मुद्दा सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे तोपर्यंत कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र केंद्रशासित झालाच पाहिजे. तिकडचा कानडींचा अत्याचार थांबलाच पाहिजे,अशी मागणी आपण या ठरावाद्वारे केली पाहिजे व विधीमंडळाकडून केंद्र सरकारकडे पाठवली पाहिजे, असं शिवेसना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले.
मराठी माणसासाठी आणि महाराष्ट्रासाठी एकत्र आहे. सीमाप्रश्नावर एकमत असल्याने सर्वांचे आभार. हा माणुसकीचा लढा आहे, असं ठाकरे म्हणाले व त्यांनी सीमाप्रश्नासंदर्भात पेन ड्राइव्ह सादर करण्यात आला. यामध्ये चीत्रफीत असल्याच बोलल जात आहे.
केंद्र सरकार पालक म्हणून वागतय का? कर्नाटक आग्रही भूमिका मांडते तशाप्रकारे आपले सरकार भूमिका मांडते का? मुख्यमंत्र्यांना दिल्ली जाण्याची गरत होती का? सीमावादाच्या मुद्यावर दिल्लीत तोंड का उघडत नाही. असे अनेक सवाल उद्धव ठाकरे यांनी सभागृहात उपस्थित केले.
सोबतच, कर्नाटक सरकार मराठी भाषिकांवर अन्याय करत आहे. त्यांचे व्यवहार मराठीत असतानाही त्यांनी मराठी भाषा शिकून दिली जात नाही. जोपर्यंत हा वाद कोर्टात प्रलंबित आहे तोपर्यंत हा भाग केंद्रशासित प्रदेश म्हणून घोषित करावा, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button