सिंगापूरच्या कंपनीचं तेलवाहू बार्ज समु्द्रात पलटी, तटरक्षक दलाचे नागरिकांना सतर्कतेचे आदेश
![Singaporean company's oil barge overturned in the sea, Coast Guard orders citizens to be alert](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Singaporean-companys-oil-barge-overturned-in-the-sea-Coast-Guard-orders-citizens-to-be-alert.jpg)
रत्नागिरी : सिंगापूर येथील कंपनीचे तेलवाहू बार्ज १० दिवसांपू्र्वी खोल सुमद्रात पलटी झालं होतं. त्या तेलवाहू बार्ज संदर्भात नवी माहिती समोर आली आहे. भारतीय तटरक्षक दलानं त्या बार्जमधील तेल आणि इतर वस्तू समुद्रात आणि समुद्र किनाऱ्यावर वाहून येण्याची शक्यता असल्यानं नागरिकांना सतर्कतेचे आदेश दिले आहेत. भारतीय तटरक्षक दलाकडून या बार्जच्या शोधासाठी मोहीम राबवण्यात आली होती. भारतीय तटरक्षक दलानं १७ जुलैपासून शोध मोहीम सुरु केली होती. हवाी पाहणी केल्यानंतर बार्ज गुहागरमधील पालशेत समुद्र किनारी लागल्याची माहिती आहे. यानंतर भारतीय तटरक्षक दलानं नागरिकांना सतर्कतेचं आव्हान केलं आहे.
सिंगापूरच्या कंपनीचं तेलवाहू बार्ज खोल समुद्रात पलटी झालं होतं. त्या बार्जचा संपर्क ९ जुलैपासून तुटला होता. भारतीय तटरक्षक दलाकडून यानंतर बार्जचा शोध सुरु करण्यात आला होता. भारतीय तटरक्षक दलाकडून हवाई पाहणी करण्यात आली होती. भारतीय तटरक्षक दलाच्या माहितीनुसार ते बार्ज गुहागर मधील पालशेत समुद्र किनारी लागले असल्याची माहिती आहे.
बार्ज वस्तू समुद्र किनाऱ्यावर येण्याची शक्यता
बार्ज पलटी झाल्याननंतर ते गुहागरच्या पालशेत समुद्र किनाऱ्याच्या परिसरात लागल्याची माहिती आहे. मात्र, बार्जमधील तेल आणि बार्जमधील इतर वस्तू समुद्रामध्ये आणि समुद्र किनाऱ्यावर वाहून येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नागरिकांना सतर्कतेचं आवाहन
भारतीय तटरक्षक दलानं बार्जमधील वस्तू आणि तेल समुद्र किनाऱ्यावर वाहून येण्याची शक्यता असल्यानं नागरिकांनी सतर्क राहावं, असं आवाहन केलं आहे. सध्या बार्जचं डेब्रीस आणि बार्जमधून तेलाची गळती झाली नसल्याचं देखील सांगण्यात आलं आहे. भारतीय तटरक्षक दलानं यासंदर्भात सिंगापूरच्या एएसएल ऑफशओअर अँड मरीन प्रायव्हेट लिमिटेड, सिंगापूरला यासंदर्भातील पुढील कार्यवाही करण्यासाठी कळवण्यात आलं आहे.