Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमुंबई

बंडखोर आमदारांना राऊतांचा इशारा…शिवसैनिक फक्त आदेशाची वाट बघत आहेत!

मुंबई : आमदारांनी केलेल्या बंडाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची आज महत्त्वपूर्ण बैठक होत आहे. या बैठकीआधी पक्षाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत असलेल्या आमदारांवर निशाणा साधला आहे. ‘शिवसेना हा पक्ष शिवसैनिकांच्या रक्त आणि घामातून उभा राहिला आहे. त्यामुळे कोणाकडे जास्त पैसे आहेत म्हणून हा पक्ष हायजॅक केला जाऊ शकत नाही,’ असा हल्लाबोल राऊत यांनी केला आहे.

‘शिवसेनेच्या आजच्या बैठकीत पक्षाचं वर्तमान आणि भविष्य याबाबत महत्त्वाचे निर्णय होतील. लाखो शिवसैनिक आहेत म्हणून मी शिवसेनाप्रमुख आहे, असं दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे नेहमी सांगायचे. हेच शिवसैनिक आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या पाठिशी ठामपणे उभे आहेत. मुंबईत शिवसैनिकांची रीघ लागली आहे. हे शिवसैनिक आता फक्त आदेशाची वाट बघत आहेत,’ असं म्हणत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोरी केलेल्या शिवसेनेच्या इतर आमदारांना आक्रमक इशारा दिला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button