पीएमपीएमएल चालकाला मारहाण; पिंपरी गावातील घटना
![PMPML driver beaten; Incident in Pimpri village](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/03/pmpml-pcmc.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
पीएमपीएमएल चालकाला मारहाण करून नाकाला दुखापत केली. यामुळे चालकाच्या नाकाला टाके पडले आहेत. कारला बस घासल्याने, पिंपरी गाव बस स्टॉप, एम एस ई बी ऑफिस, पिंपरी येथे गुरुवारी (दि.24) सायंकाळी 4.30 वा ही घटना घडली.
शरद लक्ष्मण तांदेळे (वय 32, रा. लोणी काळभोर) असे जखमी पीएमपीएमएल चालकाचे नाव आहे. शनिवारी पिंपरी पोलीस ठाण्यात त्यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून MH 03 AM 6293 या कार चालकाविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएमपीएमएल चालक शरद तांदेळे पिंपरी गाव बस स्टॉप येथे बस वळवत होते. त्यावेळी आरोपी यांच्या कारला बस घासली. त्यामुळे रागावलेल्या कार चालकाने पीएमपीएमएल चालक शरद तांदेळे यांना मारहाण केली व त्यांच्या नाकाला गंभीर दुखापत केली. तांदेळे यांच्या नाकाला त्यामुळे टाके पडले. सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी कार चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पिंपरी पोलीस अधिक तपास करीत आहेत.