Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
आळंदीत बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल; अलंकापुरी मंगल कार्यालयातील घटना

आळंदी । प्रतिनिधी
आळंदीत बालविवाह प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अलंकापुरी मंगल कार्यालय येथे 17 मार्च 2022 रोजी हा विवाह झाला. मुलीच्या वडिलांनी शनिवारी (दि.26) दिलेल्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलाविरोधात बालविवाह प्रतिबंधक कायदा 1929 कलम 3 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अल्पवयीन मुलाने फिर्यादी यांच्या मुलीसोबत 17 मार्च रोजी आळंदी येथे विवाह केला. हा विवाह बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा ठरत आहे. त्यामुळे पालकांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.





