प्रभाग १६ मध्ये “मेरिट”वरून विरोधकांची दिशाभूल; राष्ट्रवादीची फसवी राजकारणशैली उघडी
भाजपाकडून “मेरिटचे उमेदवार” हा केवळ शब्द नव्हे तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव

पिंपरी-चिंचवड: महापालिका सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. १६ मध्ये राजकीय तापमान वाढत असताना, भाजप विरोधात खोटा नॅरेटिव्ह तयार करून आमदार शंकरभाऊ जगताप यांची दिशाभूल करण्याचा राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप आता उलट त्यांच्यावरच येत असल्याचे चित्र दिसत आहे.
भाजपकडून “मेरिटचे उमेदवार” हा केवळ शब्द नव्हे तर प्रत्यक्ष कामाचा अनुभव, प्रशासनावर पकड आणि ठाम विश्वास यांचे प्रतीक असल्याचा जोरदार दावा करण्यात येत आहे. भाजप समर्थकांचे म्हणणे आहे की, “मेरिट म्हणजे विकासकामे, सेवा, आणि लोकांशी जुळलेले नेतृत्व.”
प्रभागातील चर्चेनुसार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून भ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असून, विकासकेंद्रित नेतृत्वाला धक्का पोहचवण्यासाठी खोटा प्रचार, कुजबुज आणि दिशाभूल केले जात असल्याचे भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. भाजपकडील एका कार्यकर्त्याने सांगितले, “वास्तविक विकास, सेवा आणि लोकांशी नाळ जुळलेले नेतृत्वच खरे ‘मेरिट’ असते. फक्त आरोप करून राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीला हे कधीच समजणार नाही.”
हेही वाचा – भीम क्रांती सामाजिक संस्थेचा प्रभाग १२ तळवडे–रुपीनगरमधील राष्ट्रवादीला जाहीर पाठिंबा
विरोधकांकडे ठोस मुद्दे नाहीत
प्रभागात पाणी, रस्ते, कचरा व्यवस्थापन, नागरी सुविधा यांसारख्या कामांवर भाजपने प्रत्यक्ष काम केले आहे. प्रकल्प राबवले, निधी आणला. अशावेळी राष्ट्रवादी पक्ष फक्त टीकेपुरता मर्यादित राहिला असल्याची टीका भाजप समर्थक करत आहेत. “विरोधकांकडे विकासाचे ठोस मुद्दे नसल्यामुळे ‘मेरिटचा गोंधळ’ हा कृत्रिम विषय बनवून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न होत आहे,” असे समर्थक सांगत आहेत.
जनता स्थिर नेतृत्वाकडे; राष्ट्रवादीवर नाराजी
राजकीय तज्ज्ञांचे मत आहे की, केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाकडे प्रभागातील नागरिकांचा कल ठाम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत मतभेद, उमेदवारांची गोंधळलेली स्थिती आणि विकासाविषयी शून्य दृष्टिकोन यामुळे लोकप्रतिनिधींच्या कार्यावर नाराजी दिसून येत आहे. “प्रभाग १६ मध्ये पराभवाची हवा कुणासाठी आहे तर ती राष्ट्रवादीसाठी,” अशी कुजबुज प्रभागात सुरू आहे. मतदानाच्या आधी जाणीवपूर्वक जनतेला चुकीची माहिती देण्याचे प्रयत्न नागरिकांनी ओळखले आहेत. प्रभाग १६ मध्ये जनता आणि कार्यकर्त्यांचा विश्वास भाजपवर आहे. भाजप कार्यकर्त्यांचे म्हणणे, “गेम चेंज करणारे काम आम्ही केले, तर पराभवाचा रंग राष्ट्रवादीच्या अंगावर दिसणार आहे.”




