MumbaiNews: BSE शेअर मार्केटचं नाव मुंबई स्टॉक एक्सचेंज करावे, मनसेची मागणी
![MNS demads to rename BSE as Mumbai Stock Exchange](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/MNS-demads-to-rename-BSE-as-Mumbai-Stock-Exchange.jpg)
मुंबई – आशिया खंडातील सर्वात पहिलं आणि सर्वात मोठी आर्थिक उलाढाल असणारं बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मार्केटचं नाव बदलून मुंबई स्टॉक एक्सचेंज करण्यात यावे, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन पोस्ट लिहून ही मागणी केली आहे.
”बॉम्बे स्टॉक एक्सचेंज हे आशियाचे सर्वात जुने स्टॉक मार्केट आहे. आपणांस विनंती आहे की हे नाव बॉम्बे बदलून मुंबई स्टॉक एक्सचेंज करावे. हे स्टॉक एक्सचेंज हा महाराष्ट्र आणि भारताचा अभिमान आहे आणि याचे नाव “मुंबई स्टॉक एक्सचेंज”च असले पाहिजे,” असे ट्वीट बाळा नांदगावकर यांनी केलं आहे. दरम्यान, मुंबई शहराचं नावही यापूर्वी बॉम्बे असंच होतं. मात्र, मराठी जनांच्या भावना लक्षात घेऊन हे नाव बॉम्बेऐवजी मुंबई करण्यात आलं आहे.
9 जुलै 1875 म्हणजेच तब्बल 145 वर्षांपूर्वी मुंबईत बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची स्थापना झाली आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत असलेले BSE हे शेअर मार्केट देशातील कार्पोरेट क्षेत्राला वृद्धी प्राप्त करुन देण्यात आणि आर्थिक विकास साधण्याचं हे मोठं मार्केट आहे.