breaking-newsTOP NewsUncategorizedआंतरराष्टीयताज्या घडामोडीदेश-विदेशमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

महाराष्ट्रातील बडा प्रकल्प गुजरातमध्ये, आदित्य ठाकरेंची भाजपवर सडकून टीका!

  • महाराष्ट्राची पुन्हा उपेक्षा,
  • ठाकरेंच्या प्रयत्नांना अपयश,
  • बडा प्रकल्प गुजरातमध्ये!

मुंबई । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

ज्या प्रकल्पासाठी आम्ही सरकारमध्ये असताना खूप प्रयत्न केले, तो फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जातोय आणि त्यासाठी काही मंडळींनी प्रयत्न केले, असा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर टीका केली आहे. टीका आरोपांच्या या गदारोळात मात्र महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा एकदा उपेक्षा आली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातून १ लाख ५४ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार होती. महाराष्ट्र आणि मुंबईचं आर्थिक महत्त्व कमी करण्यासाठी राज्यातील महत्वाचे प्रकल्प आणि कार्यालये गेल्या काही वर्षात गुजरातला हलविल्याचा अनेकदा आरोप झाला. महत्त्वाची सरकारी कार्यालयं जाणीवपूर्वक मुंबईतून बाहेर नेण्यात येत असल्याचं शिवसेनेने वेळोवेळी म्हटलंय. आताही ‘फॉक्सकॉन’ प्रकल्पाच्या निमित्ताने शिवसेना आणि भाजप आमने आलंय. कारण “ज्या प्रकल्पासाठी आम्ही सरकारमध्ये असताना खूप प्रयत्न केले, तो फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला जातोय आणि त्यासाठी काही मंडळींनी प्रयत्न के”, असा आरोप करत आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजपवर टीका केली आहे. टीका-आरोपांच्या या गदारोळात मात्र महाराष्ट्राच्या वाट्याला पुन्हा एकदा उपेक्षा आली आहे.

“महाविकास आघाडी सरकारने फॉक्सकॉन प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रात मोठी गुंतवणूक आणली होती. ठाकरे सरकार बदलल्यानंतर फॉक्सकॉन प्रकल्पाचं श्रेय देखील शिंदे-फडणवीसांच्या सरकारने घेतलं होतं. पण हा प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर घालविण्याचा काही जणांचा उद्देश होता”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्षरित्या भाजप-शिंदे गटावर केली आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातून १ लाख ५४ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात येणार होती. पण हा प्रकल्प गुजरातला गेल्याने महाराष्ट्र पुन्हा एकदा मोठ्या प्रकल्पाला मुकला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button