Uncategorized

भारतीय शेअर मार्केट पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळला

अमेरिकेन केंद्रीय बँक, फेड रिझर्व्हने व्याजदरात कपातीचा निर्णय जाहीर

दिल्ली : जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेल्या अमेरिकेच्या शेअर बाजारात घसरणीची लाट आली. त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारावर आज दिसला. भारतीय शेअर मार्केट पत्त्याच्या बंगल्यासारखे कोसळले. भारतीय शेअर बाजार घसरणीसह उघडला. अमेरिकेन केंद्रीय बँक, फेड रिझर्व्हने व्याजदरात कपातीचा निर्णय जाहीर केला. त्याचा परिणाम तिथल्या शेअर बाजारावर दिसला.

फेडरल रिझर्व्ह बँकेने व्याजदरात 0.25 टक्क्यांच्या कपातीचा निर्णय घेतला. सातत्याने तिसऱ्यांदा कपातीचे धोरण राबवण्यात आले आहे. त्यामुळे बाजाराचा मूड बिघडला. जागतिक बाजारावर त्याचा परिणाम दिसून आला. एकीकडे भारतात व्याजदरात कपातीची ओरड होत असताना गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय रिझर्व्ह बँकेने त्यात कोणताही बदल केलेला नाही. तर दुसरीकडे अमेरिकन बँकेने व्याजदर कपात करताच शेअर बाजाराने त्यावर नकारात्मक प्रतिक्रिया नोंदवल्याने सर्वसामान्य गुंतवणूकदार मात्र बुचकाळ्यात पडले आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button