आज मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू
![Heavy rains continue in many districts including Mumbai, Thane, Raigad and Navi Mumbai today](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/07/Heavy-rains-continue-in-many-districts-including-Mumbai-Thane-Raigad-and-Navi-Mumbai-today.png)
मुंबई : राज्यात सध्या सर्वत्र मुसळधार पाऊस सुरू आहे. आज मुंबई, ठाणे, रायगड, नवी मुंबईसह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. कोकणातही पावसाचं धुमशान सुरू असताना आता हवामान खात्याकडून महाराष्ट्रात रेड अलर्ट जारी केला आहे. यामुळे सर्व नागरिकांना घराबाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या असून अतिआवश्यक कामासाठी बाहेर पडा असं सांगण्यात आलं आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील कोल्हापूर, पालघर, नाशिक, पुणे आणि रत्नागिरी जिल्ह्यांसाठी १४ ते १५ जुलैपर्यंत अतिवृष्टीचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. राज्याची राजधानी मुंबईत पुढील तीन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, IMD ने सांगितले की, १२ जुलै रोजी पूर्व मध्य प्रदेश, मराठवाड्यात खूप मुसळधार पावसाची शक्यता आहे.
हवामानाच्या अंदाजानुसार, १३ जुलै रोजी विदर्भात १२ आणि १६ जुलै रोजी कोकण-गोवा, मध्य महाराष्ट्र आणि गुजरात भागात पाऊस पडू शकतो. सोमवारी संध्याकाळी जारी करण्यात आलेल्या IMD च्या अंदाजानुसार, ११-१४ जुलै दरम्यान दक्षिण गुजरात प्रदेश, मध्य महाराष्ट्रातील घाट भागात आणि कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील गडचिरोलीमध्ये मुसळधार पावसामुळे नाशिकमधील अनेक नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून तीन जण बेपत्ता झाले आहेत. त्याचबरोबर गोदावरी नदीच्या काठावरील अनेक मंदिरे पाण्याखाली गेली आहेत. कोकणातही मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे अनेक नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे.
उत्तर कोकण – हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, १२ ते १५ जुलैपर्यंत उत्तर कोकणात सर्वत्र मुसळधार पाऊस असणार आहे. यामुळे अनेक गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
दक्षिण कोकण आणि गोव्यातही १२ ते १५ जुलैपर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या भागांत अनेक जिल्ह्यांना रेड अलर्ट देण्यात आला आहे.
उत्तर मध्य महाराष्ट्रातही हवामान खात्याकडून रेड अलर्ट देण्यात आला असून यामुळे सर्वत्र पाऊस कोसळेल.
हवामान खात्याकडून दक्षिण मध्य महाराष्ट्रात १२ ते १५ जुलैपर्यंत तुफान पावसाचा इशारा दिला आहे.
१२ ते १५ जुलैपर्यंत मराठवाड्यालाही अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यामुळे सर्वत्र पाऊस होऊन अनेक गावांमध्ये नद्यांना पूर येण्याचा धोका आहे.
मुंबई आयमडीकडून पूर्व विदर्भ – पश्चिम विदर्भात १२ ते १५ जुलैपर्यंत रेड अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे.
महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये रेड आणि ऑरेंज अलर्ट, एनडीआरएफची टीम सज्ज