ऑनलाईन जोडीदार शोधण्यापासून ते लग्नापर्यंत सगळं मोफत; साईबाबा विवाह संस्थानचा मोठा निर्णय
![Everything from finding a mate online to getting married is free; Big decision of Sai Baba Vivah Sansthan](https://mahaenews.com/wp-content/uploads/2022/06/download.jpg)
शिर्डी : शिर्डीत साईबाबांच्या नगरीत लग्न करण्याची इच्छा आता सहज पूर्ण होणार आहे. कारण, देशभरातल्या असंख्य मुला-मुलींसाठी साईबाबा विवाह संस्थानकडून शिर्डी विवाह डॉट कॉम सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे मुलांच्या लग्नाच्या प्रतिक्षेत असणाऱ्या पालकांसाठीही ही आनंदाची बातमी आहे.
साईंच्या चरणी कोणी नोकरीसाठी, कोणी घरासाठी, कोणी मुलाबाळांसाठी तर कोणी लग्नाच्या मागणीसाठी येत असतं. अशा भक्तांसाठी आता साईबाबा विवाह संस्थानकडून शिर्डी विवाह डॉट कॉम ही मॅट्रिमोनियल वेबसाईट सुरू करण्यात आली आहे. या वेबसाईटचं उद्घाटनही झालं असून आता यामध्ये तुम्हीही रजिस्ट्रेशन करू शकता.
सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही साईट सगळ्यांसाठी मोफत असणार आहे. इतकंच नाहीतर मनासारखा जोडीदार शोधल्यानंतर शिर्डीत सामुदायिक विवाह सोहळ्यात मोफत लग्नही लावता येणार आहे. त्यामुळे लग्न करण्याच्या विचारात असणाऱ्या तरुणाईसाठी ही आनंदाची बातमी आहे.
ही वेबसाईट मोफत असून यामध्ये तुम्हाला मनासारखा जोडीदार सहज शोधता येणार आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष रोशन कुमार यांनी दिली. आपल्या मुलांना चांगला जोडीदार मिळावा यासाठी अनेक पालक साईंच्या चरणी प्रार्थना करत असतात. पण प्रत्येकालाच शिर्डी येणं शक्य होत नाही. त्यामुळे ही ऑनलाईन साईट सुरू केल्याचं