Uncategorized

दासबोधाचे हस्तलिखित तयार करणारा विद्यार्थ्यांचा आगळावेगळा उपक्रम!

प्रकाशन सोहळा सज्जनगड आणि देहूच्या प्रमुखांच्या उपस्थितीत थाटात संपन्न

पिंपरी : मोरया शिक्षण संस्थेच्या व्ही.के. माटे हायस्कूल, श्रीधरनगर चिंचवड येथे विद्यार्थ्यांनी ग्रंथराज दासबोधातील समासांचे हस्तलिखित तयार करून एक आगळावेगळा उपक्रम राबविला. समर्थ सेवा मंडळ, सज्जनगड आणि श्रीमंत ग्रंथराज दासबोध अध्ययन मंडळ, पिंपरी चिंचवड केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने २ ऑगस्ट २०२५ रोजी आयोजित या उपक्रमात ८वी ते १०वीच्या २०० विद्यार्थ्यांनी दोन तासांत २०० समासांचे अनुलेखन करून, त्याचे एक सुंदर हस्तलिखित ग्रंथ रूपात तयार केले.

“दिसा माजी काहीतरी ते लिहावे, प्रसंगी अखंडित वाचित जावे” या समर्थ उक्तीनुसार विद्यार्थ्यांमध्ये रामदास स्वामींची विचारधारा रुजविण्याचा हेतू ठेवून, संस्थेच्या कार्यवाह व प्राचार्या मा. इंद्रायणी माटे पिसोळकर आणि उपशिक्षिका सौ. प्रांजली कुलकर्णी यांनी ही संकल्पना प्रत्यक्षात आणली. अनुलेखनानंतर या हस्तलिखित ग्रंथाचे बायंडिंग, मुखपृष्ठासह सुबक प्रकाशन करण्यात आले. ३ ऑगस्ट रोजी सायंकाळी श्री. घारे शास्त्री सभागृह, श्रीधरनगर चिंचवड येथे हा प्रकाशन सोहळा पार पडला. यावेळी देहू येथील संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांचे वंशज ह.भ.प. शिवाजी मोरे महाराज आणि मा. अजयबुवा रामदासी, सज्जनगड यांचे शुभहस्ते ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आले.

हेही वाचा     :      सर्वधर्म समभाव म्हणजे नपुंसकपणा; संभाजी भिडेंचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य 

प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना दासबोध, समर्थ परंपरा आणि संतांचे जीवनातील महत्त्व पटवून दिले. “शरीर, मन आणि बुध्दी यांची शक्ती वृद्धिंगत करण्याचे कार्य दासबोध करतो,” असे प्रतिपादन अजयबुवा रामदासी यांनी केले. कार्यक्रमाला सुहास दादा क्षीरसागर (अध्यक्ष, श्रीमत दासबोध अध्ययन मंडळ, पिंपरी चिंचवड), सौ. अपर्णा कुलकर्णी (सहकेंद्र संचालक), श्री. रणजीत सावंत (खजिनदार), श्रीमती प्रतिभा कुलकर्णी (कार्यकारी सदस्य), शालाधिपती कुमार प्रेम खरबड, आणि कुमारी आदिती इगावे यांची विशेष उपस्थिती लाभली.

या वेळी शेकडो विद्यार्थी, शिक्षक, व पालकवर्ग मोठ्या उत्साहाने उपस्थित होते.
हा उपक्रम विद्यार्थी जीवनात संस्कार, भक्ती, शिस्त आणि लेखनकौशल्य विकसित करणारा ठरला, अशी सर्वत्र प्रशंसा होत आहे.

महाईन्यूज-X वर फॉलो करा : महाईन्यूजला instagram वर फॉलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button