TOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना दिलासा, पेट्रोल-डिझेलच्या उत्पादन शुल्कात घट; पेट्रोल ९.५०, तर डिझेल ७ रुपयांनी स्वस्त

नवी दिल्ली | महागाईनं त्रस्त झालेल्या जनतेला मोदी सरकारनं मोठा दिलासा दिला आहे. केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरांत पुन्हा कपात केली आहे. केंद्र सरकारनं पेट्रोलवर 8 रुपये आणि डिझेलवर 6 रुपये प्रति लिटर उत्पादन शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल 9.50 रुपयांनी आणि डिझेल 7 रुपये प्रति लिटरनं स्वस्त होणार आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी यासंदर्भात माहिती दिली. तसेच, देशात पेट्रोल-डिझेलचे नवे दर रात्री 12 वाजल्यापासून लागू झाले आहेत.

केंद्र सरकारनं पेट्रोल-डिझेलच्या दरांत केलेल्या कपातीनंतर देशाच्या राजधानीचं शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या दिल्लीमध्ये पेट्रोल 105.41 रुपयांवरुन 95.91 रुपयांवर पोहोचलं आहे. तर डिझेल 96.67 रुपयांवरुन 89.67 रुपयांवर पोहोचलं आहे. तर मुंबईत पेट्रोलचे दर 120.51 रुपयांवरून 111.01 रुपये प्रति लिटर झाले आहेत. तसेच, डिझेलची किंमत 104.77 रुपयांवरून 97.77 रुपये प्रति लिटर होणार आहे.

केंद्र सरकाच्या मोठ्या निर्णयानंतर केरळ सरकारनंही पेट्रोल-डिझेलवरली स्टेट टॅक्समध्ये घट केली आहे. केरळ सरकारनं पेट्रोलच्या दरांत 2.41 रुपये आणि डिझेलच्या दरांत 1.36 रुपयांची घट केली आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदींनी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली होती. त्या बैठकीत सर्वसामान्यांना महागाईतून दिलासा देण्यासाठी उत्पादन शुल्क कमी करण्याचा सल्ला दिला होता. दरम्यान, भारत जगातील तिसरा सर्वात मोठा तेल ग्राहक आणि आयातदार देश आहे. देशात आपल्या गरजेच्या 85 टक्के तेल आयात केलं जातं आणि त्यामुळे किरकोळ इंधनाच्या किमती Import Parity Rates वरुन ठरवल्या जातात.

किती कमी झाला व्हॅट?

सध्या सरकार पेट्रोलवर 27.90 रुपये आणि डिझेलवर 21.80 रुपये उत्पादन शुल्क आकारते. या कपातीनंतर पेट्रोलवर 19.90 रुपये आणि डिझेलवर 15.80 रुपये अबकारी शुल्क लागेल. त्यामुळे देशभरात पेट्रोल साडेनऊ रुपयांनी तर डिझेल 7 रुपयांनी स्वस्त होणार आहे.

यापूर्वीही उत्पादन शुल्कात करण्यात आली होती कपात 

यापूर्वी गेल्या वर्षी 3 नोव्हेंबरला केंद्र सरकारनं पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्कात 5 रुपयांनी तर डिझेलवर 10 रुपयांनी कपात केली होती. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तत्कालीन विरोधी पक्षशासित राज्यांनी व्हॅट कमी केला नव्हता. महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश, केरळ आणि झारखंड यांनी व्हॅटमधून 11,945 कोटी रुपये कमावले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button