Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
फौजदार झालेल्या मजुरांच्या मुलांची बारामतीकरांनी काढली घोड्यावरून मिरवणूक
पिंपरी : फौजदार झालेल्या शहरातील सर्वसामान्य कुटुंबातील मजुरांच्या दोन मुलांची बारामतीकरांनी शहराच्या मुख्य रस्त्यावरून घोड्यावरून मिरवणूक काढत आनंद व्यक्त केला. राज्य लोकसेवा आयोगामार्फत पोलीस उपनिरीक्षक पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये या दोन्ही तरुणांनी उल्लेखनीय यश मिळवले. त्यानंतर बारामतीकरांनी अशाप्रकारे आनंद व्यक्त केला.
सुरज सुभाष मोरे आणि शुभम मिलिंद शिंदे अशी या दोन तरुणांची नावे आहे. हे दोन्ही तरुण अतिशय सामान्य कुटुंबातील आहे. सुरजचे वडील सेंट्रींग चे काम करतात तर शुभमचे वडील गॅरेजमध्ये कामाला आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असतानाही या दोघांनी राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत घवघवीत यश मिळवले. त्यांनी मिळवलेल्या या यशाचं समाजाच्या विविध स्तरातून कौतुक केले जात आहे.





