Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीपुणे

पुणे-सोलापूर महामार्गावर शिवसेना नेते तानाजी सावंत यांच्या वाहनाला अपघात

पुणे : शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या वाहनाला पुणे-सोलापूर महामार्गावर शनिवारी रात्री उशिरा अपघात झाला. या अपघातातून सावंत आणि त्यांचे सहकारी सुखरूप बचावले असून गाडीचं किरकोळ नुकसान झालं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तानाजी सावंत हे धाराशिव व भूम परंडा या भागातील शिवसंपर्क अभियानाची बैठक आटोपून पुण्याच्या दिशेला निघाले होते. मात्र वाटेत पुणे-सोलापूर महामार्गावर दौंड तालुक्यातील वरवंड येथे सावंत यांच्या चारचाकी गाडीला अपघात झाला. सुदैवाने या अपघातात तानाजी सावंत आणि त्यांच्यासोबत गाडीत असणाऱ्या कोणालाही दुखापत झालेली नाही. त्यामुळे सावंत यांच्या समर्थकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

अपघातानंतर काही वेळाने तानाजी सावंत हे पुन्हा पुण्याच्या दिशेने निघून गेले. दरम्यान, राज्यभरात सध्या शिवसेनेकडून शिवसंपर्क अभियान राबवलं जात आहे. या अभियानासंदर्भात शनिवारी तानाजी सावंत यांनी धाराशिव व भूम शहरात बैठक घेत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button