Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

मुंबईच्या नरसी मेमोरियल शाळेच्या मुख्याध्यापिका कविता संघवी यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ प्रदान

नवी दिल्ली । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।

महाराष्ट्रातील तीन शिक्षकांना शिक्षण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी वर्ष २०२२ चे ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांच्या हस्ते आज प्रदान करण्यात आले. यामध्ये मुंबईतील छत्रभूज नरसी मेमोरियल स्कूलच्या मुख्याध्यापिका कविता सांघवी, बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील दामू नाईक तांडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सहायक शिक्षक शशिकांत कुलथे आणि याच जिल्ह्यातील पारगाव जोगेश्वरी येथील जिल्हा परिषद, क्लस्टर प्राथमिक शाळेचे शिक्षक सोमनाथ वाळके यांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारा’ने सन्मानित करण्यात आले.

येथील विज्ञान भवनात ‘राष्ट्रीय शिक्षक दिना’च्या निमित्त केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्यावतीने ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ वितरण समारोहाचे आयोजन करण्यात आले. यावेळी राष्ट्रपती, केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान, केंद्रीय शालेय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी, डॉ. सुभाष सरकार, डॉ. राजकुमार रंजन सिंह, अपर मुख्य सचिव (उच्च व तंत्रशिक्षण ) राकेश रंजन, यासह वरिष्ठ अधिकारी मंचावर उपस्थित होते. याप्रसंगी देशभरातील एकूण 45 शिक्षकांना ‘राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार’ने गौरविण्यात आले. राज्यातील तीन शिक्षकांचा यात समावेश आहे. मानचिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button