Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

1 जानेवारीला पुणे-नगर महामार्ग बंद, एल्गार परिषदेला परवानगी नाही

कोरोनाच्या नव्या विषाणूमुळे सर्वत्र खबरदारी घेण्यास राज्य सरकारने आदेश जारी केले आहे. गर्दी टाळण्यासाठी राज्य सरकारने 25 डिसेंबरपासून जमावबंदीचे आदेश दिले आहेत. 1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा शौर्य दिनाच्या निमित्ताने पुणे महामार्ग बंद करण्याचा आदेश पुणे जिल्ह्याधिकाऱ्यांनी काढले आहे. कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे लोकांनी यंदाच्या वर्षी घरातूनच अभिवादन करावे, असं आवाहन प्रशासनाने केले आहे.

याच पार्श्वभूमीवर आता 1 जानेवारी रोजी पुणे – नगर महामार्ग बंद राहणार आहे. तसंच, या मार्गावरील वाहतूक 31 डिसेंबर 2020 रोजी सायंकाळी पाचपासून ते एक जानेवारी 2021 रोजी रात्री 12 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळवण्यात येणार आहे, असं जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांनी स्पष्ट केले आहे.

एल्गार परिषदेला परवानगी नाकारली

कोरेगाव भीमा येथील शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर 31 डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या एल्गार परिषदेच्या कार्यक्रमाला पुणे पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही परवानगी नाकारण्यात येत असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे.

लोकशासन संवादतर्फे ही सांस्कृतिक परिषद घेण्यात येणार होती. माजी न्यायमूर्ती बी.जी. कोळसे पाटील यांनी या परिषदेच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला होता.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button