‘स्मार्ट सिटी’ची एअर इंडियाच्या मासिकात जाहिरात
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/04/स्मार्ट-सिटी-इॅमेज.jpg)
पिंपरी : पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटीची जाहिरात एअर इंडियाच्या ‘शुभ यात्रा’ मासिकात करण्यात येणार आहे. त्यासाठी 28 लाख 86 हजार 450 रुपये खर्चास स्थायी समितीने आयत्या वेळी मान्यता दिली आहे.
केंद्र सरकारची एअर इंडिया ही विमान वाहतूक कंपनी आहे. कंपनीतर्फे देश व आंतरराष्ट्रीय पातळीवर शुभ यात्रा मासिक प्रसिद्ध केले जाते. पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या विविध प्रकल्पाची माहिती आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
तसेच, पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडचे कामकाज उच्चस्तरीय होण्यासाठी आयुक्तांनी संबंधित मासिकामध्ये जाहिरात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी 32 लाख 74 हजार रूपये खर्च आहे. त्यात 5 लाख 25 हजार रूपये विशेष सूट देण्यात आली आहे. त्यावर 5 टक्के जीसीएटी आकारला जाणार आहे. ही जाहिरात प्रसिद्ध करून सदर खर्च स्मार्ट सिटी लेखाशीर्षातून अदा करण्याचा निर्णय आयुक्तांनी घेतला आहे. त्यास स्थायीने मान्यता दिली आहे.