Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘सदाभाऊ कडकनाथ कोंबड्यांचे कुक्कुटपालन कसे करायचे याचा अभ्यास करा’, राष्ट्रवादीचा टोला

रयत क्रांती संघटनेचे सदाभाऊ खोत यांनी राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवारांचे आत्मचरित्र वाचावं की न वाचावं असा प्रश्न पडलाय, कारण पवारांनी त्यांच्या आत्मचरित्रमध्ये म्हटलंय की मार्केट कमिट्या बंद झाल्या पाहिजेत, अडत असो वा हमाली ही शेतकऱ्यांकडून घेतली नाही पाहिजे. कुणालाही शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदी करता आला पाहिजे. आता दुसरीकडं पवार म्हणतात माझा दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा आहे, असं खोत म्हणाले होते.

त्यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून देखील प्रत्युत्तर देण्यात आले असून, सदाभाऊंनी आधी कोंबड्यांचे कुक्कुटपालन कसे करायचे याचा अभ्यास करावा, असा टोला लगावला आहे.

‘सदाभाऊ, तुम्ही साहेबांच आत्मचरित्र वाचण्याआधी, कडकनाथ कोंबड्यांच कुक्कुटपालन कस करायचं याचा नीट अभ्यास करा..’, असा खोचक टोला बीड जिल्हापरिषदेचे माजी अध्यक्ष व राष्ट्रवादीचे नेते विजयसिंह पंडित यांनी लगावला आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button