Uncategorizedपिंपरी / चिंचवड

विवाहितेचा छळ प्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल

देहूरोड येथे विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी घरच्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवाहितेचा छळ प्रकरणी पतीसह, सासरे व दिर असे तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गांधीनगर, देहूरोड येथे गुरूवार (दि.24) हि घटना घडली.  

याप्रकरणी पती रवी हनुमंत जाधव (वय 30), सासरे हनुमंत मल्हारी जाधव व दिर कुमार हनुमंत जाधव (सर्व रा. गांधीनगर, देहूरोड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी विवाहित महिलेनं देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

फिर्यादीने दिलेल्या माहितीनुसार, ‘कामावरून हाफ डे घेऊन आले का’ असे फिर्यादी पत्नीने पतीला विचारले, त्यावर ‘तू माझ्या शंका घेते का’ असे पती म्हणाला. यावरुन पत्नीने मच्छर मारण्याचे औषध ऑल आऊटचे द्रावण पिले. उपचारासाठी तिला वायसीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर बरे झालेल्या महिलेकडे तिचे सासरे व दिर तुला काही काम येत नाही म्हणून तक्रार करु लागले.

तसेच, सोन्याची चैन करण्यासाठी माहेरून पैसे आण अशी मागणी केली. शिवीगाळ करत त्यांनी महिलेला तुला नांदु देणार नाही म्हणत, शारीरिक व मानसिक छळ केला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक रामेकर अधिक तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button