TOP News । महत्त्वाची बातमीUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय
यंदाची प्रजासत्ताक दिनाची परेड रद्द करण्याची ‘या’ भाजप नेत्याची मागणी
यंदाचा प्रजासत्ताक दिनाची परेड रद्द करण्याची मागणी भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी पंतप्रधान मोदींना केली आहे. कोरोना व्हायरसच्या प्रार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून परेड रद्द करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
ब्रिटेनमध्ये नव्या कोरोना व्हायरसने थैमान घातला आहे. तेथे पुन्हा एकदा लॉकडाऊन करण्यात आले. यंदाच्या प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आमंत्रिक करण्यात आले आहे. पण सध्याची परिस्थिती पाहता ही भेट रद्द करावी, अशी मागणी देखील स्वामी यांनी केली आहे.





