बायडेन आणि कमला हॅरिस यांच्या शपथविधीबाबत डोनाल्ड ट्रम्प यांची मोठी घोषणा; ट्वीट करुन म्हणाले..
अमेरिकेचे मावळते अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आपला पराभव अजूनही स्वीकारला नाही. त्यामुळेच ते जो बायडेन यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची माहिती मिळत आहे. 78 वर्षीय डेमोक्रॅटिक पक्षाचे नेते बायडेन 20 जानेवारीला अध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्याचबरोबर, 56 वर्षीय भारतीय वंशाच्या नेत्या कमला हॅरिस उपराष्ट्रपतीपदाची सूत्रे स्वीकारतील.
आपल्या ट्विटर अकाऊंटवर 12 तासांच्या बंदीनंतर ट्रम्प यांनी दोन ट्विट केले. ते म्हणाले, “जे लोक विचारत आहेत त्यांना मी सांगेन की मी 20 जानेवारीला शपथविधी कार्यक्रमाला जाणार नाही.” अमेरिकन काँग्रेसने गुरुवारी संयुक्त अधिवेशनात अध्यक्ष पदासाठी जो बायडेन आणि उपराष्ट्रपती पदासाठी कमला हॅरिस यांच्या निवडीची औपचारिक घोषणा केली. तत्पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटल बिल्डिंग (संसद भवन) वर हल्ला केला. यावेळी झालेल्या हिंसाचारात पाच लोकांचा मृत्यू झाला आहे.
To all of those who have asked, I will not be going to the Inauguration on January 20th.
— Donald J. Trump (@realDonaldTrump) January 8, 2021