Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विधानसभा हंगामी अध्यक्षपदी कालिदास कोळंबकरांची नियुक्ती

मुंबई : गुरुवारी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची तसेच एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर आज विधानसभेच्या हंगामी अध्यक्षांचा शपथविधी पार पडला आहे. त्यासाठी भाजपाचे आमदार कालिदास कोळंबकर यांची निवड करण्यात आली आहे. राज्यपाल सीपी राधाकृष्णन यांनी आज त्यांना हंगामी अध्यक्षपदाची शपथ दिली.

हेही वाचा –  रेपो दर ६.५ टक्क्यांवर कायम, RBI चा निर्णय

राजभवनात हा शपथविधी पार पडला असून ७ ते ९ डिसेंबर दरम्यान होणाऱ्या विशेष अधिवेशनासाठी आमदार कालिदास कोळंबकर यांची हंगामी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे. पुढचे तीन ते विधानसभेचे अध्यक्ष म्हणून काम बघणार असून यादरम्यान ते नवनिर्वाचित आमदारांना पद आणि गोपनीयतेची शपथ देणार आहेत.

तीन दिवस चालणाऱ्या या विशेष अधिवेशनात पहिले दोन दिवस नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी होणार असून ९ डिसेंबर रोजी विधानसभेच्या नव्या अध्यक्षांची निवड होणार आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button