पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आयुक्तपदी कायम
![PCMC commissioner Shravan Hardikar promoted to the same post](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/07/PCMC-chief-Shravan-Hardikar-1200.jpg)
पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा 3 वर्षांचा कार्यकाल एप्रिल महिन्यातच पूर्ण झाला. त्यामुळे त्यांची बदली होणार अशी चर्चा मागील अनेक दिवसांपासून माध्यमांतून सुरू होती. मात्र या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. याचे कारण की हर्डीकर यांना त्याच पदावर बढती मिळाल्याने ते आयुक्तपदी कायम राहणार आहेत.
राज्य सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव (सेवा) सुजाता सौनिक यांनी त्याबद्दलचे पत्र आयुक्त हर्डीकर यांनी आज दिले. १ जानेवारी 2021 पासून सद्याच्याच पदावर स्थानापन्न पदोन्नती देण्यात आली आहे.
वाचाः मुंबईमध्ये आज रात्री 11 ते उद्या पहाटे 6 पर्यंत कडक नाईट कर्फ्यू- मुंबई पोलिस
हर्डीकर यांनी 27 एप्रिल 2017 ला महापालिका आयुक्तपदाची सुत्र होती घेतली होती. त्यांचा 3 वर्षांचा कार्यकाल एप्रिल महिन्यातच पुर्ण झाला. मात्र कोरोना व्हायरसच महामारीच्या संकटात त्यांना मुदतवाढ देण्यात आली होती.
गेली 8 महिने कोरोना काळातील केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दलच त्यांना बढती देण्यात आल्याची सध्या चर्चा आहे.