ठाणे महापालिका प्रशासनावर काँग्रेसचा गंभीर आरोप, अधिकाऱ्याला महिन्याला 3 कोटींचा हप्ता
ठाणे महापालिका प्रशासनावर काँग्रेसने गंभीर आरोप केला आहे. ठाणे महापालिकेतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याला दर महिन्याला 3 कोंटीचा हप्ता मिळतो, असा गंभीर आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. शहरातील अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकामांसाठी हा हप्ता मिळत असल्याचा आरोप ठाणे काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी केला आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रात वाढलेल्या अनधिकृत बांधकामांविरोधात ठाणे काँग्रेसच्यावतीने आंदोलन पुकारण्यात येणार आहे. ग्रेसने या बांधकामाविरोधात आणि या बांधकामांना अभय देणाऱ्या सर्वच घटकांविरोधात आंदोलनाची घोषणा केली आहे. तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशीची मागणी देखील त्यांनी केली.
अनधिकृत बांधकामांबाबत आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी प्रदेश काँग्रेस सरचिटणीस मनोज शिंदे, शहर काँग्रेस सरचिटणीस आणि प्रवक्ते सचिन शिंदे, प्रवक्ते गिरीष कोळी आणि सरचिटणीस विजय बनसोडे हे उपस्थित होते.





