चिंता करायची गरज नाही, कारण… – फडणवीसांची टोलेबाजी
![Devendra Fadnavis taunt to ajit pawar in Pune](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/14_01_292467645ajitpawar.jpg)
पुण्याचे प्रश्न मार्गी लावताना आता चिंता करायची गरज नाही, कारण राज्याची तिजोरीच पुण्याकडे आहे, असा मिश्किल टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी लगावला. पुणे महानगरपालिका सभागृहात भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनेचे ऑनलाईन पदधतीने लोकार्पण सोहळा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी भाषणात ते बोलत होते.
दादा, दोन तीन दिवसाच्या बातम्या द्यायच्या असतील तर तुम्ही मला चहाला बोलवा, किंवा तुम्ही माझ्याकडे चहाला या. विकासासाठी सर्वांनी एकत्र येण्याची परंपरा आहे, अशी टोलेबाजी देखील यावेळी फडणवीसांनी केली.
ज्याचा सर्वांगीण विकास होत असताना वाढते नागरिकरण विचारात घेत पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे, यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले.
पुणे व पिंपरी शहराची वाढ झपाट्याने होत आहे. त्यात महापालिकेत नव्याने २३ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे पुण्यातील पूर्व भागातील सुमारे 15 लाख लोकांना सुरळीत पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे.