Uncategorizedपिंपरी / चिंचवड
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर बलात्कार ; आरोपी अटकेत
विवाहित पुरुषाने लग्नाचे आमिष दाखवून एका महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी 25 वर्षीय महिलेनं निगडी पोलीस ठाण्यात शुक्रवारी (दि.1) दाखल केलेल्या फिर्यादीवरून आरोपीला अटक करण्यात आली आहे.
राकेश दिलीप शिंदे (रा. ओटास्किम, निगडी ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
अटक आरोपीचे पहिले लग्न झाले असताना देखील त्याने फिर्यादी महिलेला विश्वासात घेऊन लग्नाचे आमिष दिले. तसेच, तिला शिवीगाळ करत मारहाण केली आणि ‘पोटातील बाळ पाडून टाक’, अशी धमकी दिल्याची माहिती फिर्यादीत म्हटलं आहे.
आरोपीने 25 डिसेंबरला फिर्यादी महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवल्याचं फिर्यादीत म्हटले आहे.
याप्रकरणी अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक व्हि. एम. धुमाळ करत आहेत.





