कृषी दिनानिमित्त रत्नाई कृषी महाविद्यालयातर्फे वृक्षारोपण

- वृक्ष दिंडीद्वारे लवंग गावात जनजागृती
पिंपरी – कृषी दिनानिमित्त रत्नाई कृषि महाविद्यालयातील कृषीकन्येच्या वतीने लवंग (ता.माळशिरस) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिसरात वृक्ष लागवड करण्यात आली. तसेच गावात वृक्ष दिंडी काढत गावक-यामध्ये जनजागृतीही करण्यात आली आहे.
यावेळी लवंग गावात वृक्षारोपण लवंग गावच्या सरपंच योगिता राजेंद्र सरवदे याचे हस्ते करण्यात आले. या कार्यक्रम उपसरपंच एस.के.कदम, ग्रामसेविका पी.ए.पवार, माजी सरपंच एस.आर.कोकाटे, मुख्याध्यापिका के.पी.नंदवटे, मंडल अधिकारी टी.डी. काकडे, डाॅ.डी.पी.कोरटकर, प्राचार्य आर.जी.नलावडे, शाळा व्यवस्थापन अध्यक्ष सीमा वाघ, पोलिस पाटील विक्रम भोसले, राजकुमार पाटील, राजेंद्र मुगसे, शहाजी वाघ,नितीन वाघ, विनोद भोसले, बाळासाहेब सरवदे, समन्वयक एस.एम.एकतपुरे, एस.आर.आडत, डी.एस. मेटकरी उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे कृषिकन्या सोनाली माकर, स्मिता काळे, सुप्रिया डांगे, भक्ती मगर, सुप्रिया देवकर, अमृता जाधव, काजल ठवरे, संजिवनी तरंगे यांनी आयोजन केले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन भक्ती मगर यांनी केले. तर अमृता जाधव यांनी आभार मानले.





