ईडीची नोटीस मलाही येऊ शकते – रोहित पवार
![“…या संस्कृतीची भाजपाला सवय”; पंतप्रधानांसोबतच्या बैठकीला मुख्यमंत्र्यांच्या गैरहजेरीवरील टीकेला रोहित पवारांचं प्रत्युत्तर](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/images_1584087724377_rohit_pawar.jpg)
महाविकास आघाडीतील सरकार पाडण्यासाठी ईडी सारख्या संस्थांचा वापर केला जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीतील नेत्यांनी केला होता. राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी कदाचित उद्या मलाही ईडीची नोटीस येईल. ईडीच्या माध्यमातून भाजपाकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे, असा आरोप केला आहे.
रोहित पवार यांनी आज पहाटे 4 वाजता नवी मुंबईतील एपीएमसी मार्केटला भेट दिली. यावेळी संवाद साधला. ईडी चौकशीबाबत ते म्हणाले की, उद्या मलाही ईडी नोटीस पाठवेल. ईडीच्या माध्यमातून भाजपकडून विरोधकांना लक्ष्य केले जात आहे.
कृषी कायद्यावरून देखील रोहित पवारांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. केंद्र सरकारने राज्य सरकारवर कृषी कायदा लादला आहे. पण राज्य सरकार शेतकरी हिताचा निर्णय घेईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
एपीएमसी मार्केटमधील माथाडी कामगार, व्यापारी वर्गाच्या समस्या यावेळी त्यांनी जाणून घेतल्या असून शेतकरी वर्गाच्या संरक्षणासाठी एपीएमसी मार्केटची गरज आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले आहे.