Uncategorized

मोठी बातमी : हिंदूराष्ट्र सेनेच्या तुषार हंबीर यांच्यावर ससून रुग्णालयात कोयत्याने हल्ला

पुणे : हिंदूराष्ट्र सेनेच्या तुषार हंबीर यांच्यावर ससून रुग्णालयात कोयत्याने हल्ला करण्यात आला. ही घटना सोमवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास ससून रुग्णालयात घडली आहे. माहिती मिळताच पोलिस उपायुक्त सागर पाटील, बंडगार्डन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रताप मानकर यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. हल्लेखोर फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

थेट ससून रुग्णालयात शिरून हल्लेखोरांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यामुळे खळबळ उडाली आहे. हंबीर यांच्यावर यापूर्वीही येरवडा कारागृहात हल्ला झाल्याची घटना घडली आहे. हंबीर याच्यावर खुनासारखे गंभीर गुन्हे दाखल आहेत. सध्या तो येरवडा कारागृहात आहे. आजारी असल्यामुळे २५ ऑगस्टपासून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरू होते.

सोमवारी रात्री पावणे दहा वाजताच्या सुमारास तीन ते चार जण कोयते घेऊन ससून रुग्णालयात आले. त्यांनी हंबीरला मारण्याचा प्रयत्न केला. मात्र, तेथे बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने प्रसंगावधान राखत हल्लेखोरांना रोखले. मात्र, त्यांच्यासोबत झालेल्या झटापटीत पोलिस कर्मचारी जखमी झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button