breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

वायकरांच्या शिंदे गटातील प्रवेशाबाबत उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray : गोरेगाव येथे उद्धव ठाकरेंची जनसंवाद सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते ठाकरे गटाचे नेते  रवींद्र वायकर आज शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. यावर ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. “ज्याला कोणाला वाटत असेल इकडचा खडा तिकडं केला तर परिणाम होईल. मात्र काल जी गर्दी होती ती आजही आहे. मोठी झाली ती लोकं गेली. मात्र मोठं करणारे इथेच आहेत”, अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे..

उद्धव ठाकरे म्हणाले, उत्तर पश्चिममध्ये मी अमोल कीर्तिकर याचं नाव घोषित केले. देशभक्त आणि द्वेषभक्त असा हा लढा आहे. कोणाला उतरवायचे मैदानात त्याला उतरावा. हुकूमशाही काढण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत.शिवसेनेच्या झेंड्याला डाग लावण्याचे काम भाजपने केले. त्यांच्यावर हा खरा भगवा फडकवण्याचं काम मला करायचंय.निष्ठावंताला पराभव हा कधी माहीत नसतो. मुठभर मावळे एकनिष्ठ असतात.

हेही वाचा – ‘ईडीच्या प्रेसनोटमध्ये खूप मोठ्या चुका’, रोहित पवार यांची गौप्यस्फोट

एका बाजूला देशभक्त आणि एका बाजूला द्वेषभक्त असा हा लढा आहे. माझं मत आहे की, असा कोणीही शिल्लक राहता कामा नये, की जो म्हणेन तुम्ही जिंकलात कारण मी तिकडे नव्हतो. तुमचा उत्साह पाहिल्यानंतर मला खात्री आहे. गद्दारांपेक्षा मुठभर मावळे यांच्यासाठी बास आहेत.

उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपची  १०० वर्ष सगळी भाकड ठरली आहेत. यांना सगळी लोक आयात करावी लागत आहे. हे सगळे आयारामांची मंदिर बांधत आहेत. ओडिसामध्ये प्रशांत जगदेव हे दिव्य व्यक्त आहेत. त्यांनी भाजप कार्यकर्त्यांवर गाडी घुसवली होती. त्यानंतर नवीन पटनायक यांनी लाथ मारुन पक्षातून बाहेर काढले. आता भाजपने त्यांना पक्षात घेऊन उमेदवारी दिली आहे. मुस्लीम लोक मोठ्या संख्येने आपल्यासोबत आले आहेत. भाजप आणि आपल्या भगव्यात फरक आहे. ह्रदयात राम आणि हाताला काम हे शिवसेनेचे हिंदूत्व आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button