ताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

उद्धव ठाकरेंनी घेतला चंद्रकांत पाटलांचा समाचार, म्हणाले, तर आपणही यांच्यासारखं मंत्री बनून शाब्दीक भीक मागत असतो”

मुंबई : काही दिवसांपूर्वी राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांबद्दल एक वक्तव्य केलं होतं. महात्मा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भीक मागून शाळा सुरु केल्या होत्या, असं विधान चंद्रकांत पाटील यांनी केलं होतं. चंद्रकांत पाटील यांच्या या वक्तव्याचा आता शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरेंनी समाचार घेतला आहे.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील?
औरंगाबादमधील पैठणमध्ये एका कार्यक्रमात शाळांच्या अनुदानाबद्दल बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, “सरकारवर अवलंबून का राहताय? या देशात कर्मवीर भाऊराव पाटील, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा जोतिराव फुले यांनी शाळा सुरु केल्या आहेत. या सगळ्यांनी शाळा सुरु करताना सरकारने त्यांना अनुदान दिलं नाही. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, शाळा चालू केली मला पैसे द्या. आता त्याकाळी १० रुपये देणारे होते. आता १०-१० कोटी रुपये देणारे लोक आहेत ना?”, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं होतं.

मुंबईत महाविकास आघाडीच्या ‘महामोर्चा’त बोलताना उद्धव ठाकरेंनी संबोधित केलं. “छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आली. फुले दाम्पत्य नसते, तर आपण कोठे असतो, हे एका मंत्र्याने भीक शब्द वापरून दाखवून दिलं आहे,” असे उद्धव ठाकरेंनी सांगितलं.

“तेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना शेणमार आणि धोंडमार सहन करावी लागली, पण ते डगमगले नाहीत. मी माझ्या लोकांना शिकवणार असा निर्धार त्यांनी केला. त्या शिकल्या नसत्या आणि आपण शाळेत गेलो नसतो. आणि आपणही यांच्यासारखे मंत्री बनून अशी शाब्दीक भीक मागत असलो असतो. हे वैचारिक दारिद्र्य आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button