breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहराची भूजलपातळी वाढवण्यासाठी पालिका प्रशासनाने पर्याय शोधावेत

  • भाजयुमोची आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे मागणी

पिंपरी / महाईन्यूज

पिंपरी-चिंचवडची वाढती लोकसंख्या विचारात घेता पाण्याच्या अनेक समस्या उद्भवत आहेत. शहरातील भूजलपातळी मोठ्या प्रमाणात खालवलेली आहे. जमिनीतील भूजलपातळी वाढवण्यासाठी पावसाचे पाणी जमिनीत जिरवण्याचा भाजप युवा मोर्चाच्या पदाधिका-यांनी आयुक्त राजेश पाटील यांना उत्तम पर्याय सूचवला आहे. त्यासंदर्भात भाजयुमोच्या शहरातील पदाधिका-यांनी त्यांना निवेदन देखील दिले आहे.

भाजयुमोने महापौर उषा उर्फ माई ढोरे यांना देखील निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, दिवसेंदिवस आपल्या शहराची वाढती लोकसंख्या, वाढलेली पाण्याची गरज व भविष्यातील पाण्याच्या मुलभुत स्त्रोतांवर आतापासूनच ठोस उपाययोजना करून आपले शहर “पाणीदार” बनवायला हवे. महापालिकेअंतर्गत होणारे रस्ते, फुटपाथमुळे पावसाचे पाणी जमीनीत न मुरता ते वाहुन जाते. या पाण्यासाठी बनवलेल्या “स्ट्रॉर्म वॉटर लाईन्स” थेट नदीपात्राला जोडल्या आहेत. त्यामुळे पावसाचे सर्व पाणी नदीपात्रातून वाहून जाते. हे पाणी जमिनीत जरपण्यासाठी आपल्याकडे सक्षम यंत्रणा कार्यान्वीत केली पाहिजे. त्यासाठी पालिका स्तरावर निर्णय झाला तर ते शक्य असल्याचे आयुक्तांना सूचवण्यात आले आहे.

शहरात रस्त्यालगत “स्ट्रॉर्म वॉटर लाईन” बनवण्यात आल्या आहेत. त्याद्वारे जागोजागी पाणी जमीनीत मुरवण्यासाठी “रिचार्ज पिट” बनवण्यात यावेत. पावसाचे पाणी खड्ड्यांद्वारे जमिनीमध्ये जिरपण्याची व्यवस्था होईल. भविष्यात शहरातील भूजलपातळी वाढेल आणि पिंपरी-चिंचवड “पाणीदार शहर” होईल. शहराच्या प्रत्येक भागासाठी भूमिगत केलेल्या स्ट्रॉर्म वॉटर लाईनला रिचार्ज पिट करण्यात यावेत. त्यामुळे भुजल पातळी वाढेल व पुनर्भरण होईल. यासाठी संबंधीत विषयातील जाणकार पेवटेक कन्सल्टंटचे विकास ठाकर यांचे मार्गदर्शन घ्यावे. त्यांची ही संकल्पना राबवल्यास भविष्यात शहराला फायदा होईल. या उपक्रमामुळे सोसायटींना दरवर्षी लागणारा टँकररूपी खर्च कमी होईल. सामान्यांना आर्थिक भुर्दंड बसणार नाही, अशी सूचना करण्यात आली.

निवेदन देताना पक्षनेते नामदेव ढाके, शहराचे भाजयुमो अध्यक्ष संकेत चोंधे, सरचिटणीस दिनेश यादव, उपाध्यक्ष शिवराज लांडगे, पुजा आल्हाट, चिटणीस प्रकाश चौधरी, मंडलाध्यक्ष उदय गायकवाड, सोशल मीडीया संयोजक विक्रांत गंगावणे, वरद जोशी, जवाहर ढोरे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button