breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

आरेचा आग्रह रेटू नका, पर्यावरणाला हानी पोहोचवू नका, उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व फडणवीसांना आवाहन

मुंबई :शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर शिवसेना भवनात पत्रकारांशी संवाद साधला. उद्धव ठाकरेंनी माझ्यावरील राग माझ्यावर काढू नका. मुंबईच्या काळजात कट्यार घुसली असं करु नका, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं. आरेचा प्रस्ताव बदलणं हा अहंकार नव्हता, पर्यावरणासाठी निर्णय घेतलेला होता, तो निर्णय नव्या सरकारने बदलू नये. माझ्यावर राग आहे, तो माझ्यावर काढा, मुंबईकरांच्या पाठीत सुरा खूपसू नका, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी केलं.

  • उद्धव ठाकरे काय म्हणाले?

बर्‍याच दिवसांनी पत्रकारांना फेस टु फेस भेटतोय. नवीन सरकारचे अभिनंदन आणि या सरकारकडुन महाराष्ट्राचे भले व्हावे ही इच्छा!, असं उद्धव ठाकरे म्हणाले. ज्यांनी हे सरकार स्थापन केले त्यांच्या मते त्यांनी शिवसैनिकाला मुख्यमंत्री केले. हेच तर मी सांगत होतो, जर हे पूर्वीच केलं असत तर आता अडीच वर्षे पूर्ण झाली असती, आणि जे झाले ते सन्मानाने झालं असतं. तेव्हा नकार दिला, आता अस का केलं? शिवसेनेला बाजुला ठेवून शिवसैनिकाला मुख्यमंत्री असं होऊ शकत नाही.

माझ्यावरील राग माझ्या मुंबईवर काढू नका. मुंबईच्या काळजात कट्यार घुसली अस करु नका. तुम्हाला हात जोडुन विनंती, माझ्यावरचा राग मुंबईवर काढू नका. मी मुंबईकरांच्या वतीने आरेचा आग्रह रेटु नका असं आवाहन करतो, असं उद्धव ठाकरे म्हणाले. पर्यावरणाला हानी पोहोचवू नका. तिकडे वन्य जीवन आहे. आरेचा निर्णय बदलल्यामुळे दु:ख झाले, असं उद्ध ठाकरेंनी म्हटलं. आता राज्यात आणि केंद्रात तुमचंच सरकार आहे. कांजूरमार्गचा प्रस्ताव दिला होता. ही जमीन मुंबईकरांची आहे. तुम्ही मुंबईच्या पर्यावरणाशी खेळू नका, कांजूरमार्गचा प्रस्ताव कायम ठेवा, मेट्रो अंबरनाथ बदलापूरपर्यंत नेता येईल, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button