TOP Newsपिंपरी / चिंचवडमहाराष्ट्रराजकारण

फडणवीस गो बॅक म्हणत काळे झेंडे दाखवल्या प्रकरणी काँग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम यांच्यासह 24 जणांवर गुन्हा दाखल

पिंपरी l प्रतिनिधी

माजी आमदार, माथाडी नेते कै. अण्णासाहेब पाटील स्मारकाचे उदघाटन करण्यासाठी आलेल्या माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवत ‘फडणवीस गो बॅक’ अशा घोषणा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी दिल्या. ही घटना रविवारी (दि. 6) सायंकाळी पावणे पाच वाजता दसरा चौक, चिंचवड येथे घडली. याप्रकरणी काँग्रेसच्या शहराध्यक्षांसह 24 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काँगेसचे शहराध्यक्ष कैलास कदम (वय 50, रा. खराळवाडी, पिंपरी), काँग्रेसच्या महिला शहराध्यक्ष सायली नढे (वय 30), किरण नढे (वय 35), विजय ओव्हाळ, आबा खराडे, उमेश खंदारे, विश्वनाथ जगताप, ज्ञानेश्वर मलशेट्टी, सौरभ शिंदे, अर्जुन लांडगे, किरण कोचकर, इस्माईल संगम, दिनकर भालेराव, निर्मला खैरे, बाबा बनसोडे, सतीश भोसले, प्रिया कदम, शरद गायकवाड, पांडुरंग जगताप, विशाल सरोदे, आकाश शिंदे, निखिल भोईर, सुरज गायकवाड, निर्मला कदम आणि इतर कार्यकर्त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस फौजदार दादाराम जाधव यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेच्या वतीने केएसबी चौकातील अण्णासाहेब पाटील पुतळा स्थलांतरित करण्यात आला असून परिसर सुशोभित करण्यात आला आहे. त्या कामाचे उदघाटन माजी मुख्यमंत्री विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. फडणवीस हे कार्यक्रमाच्या ठिकाणी आले असता काँग्रेसचे कार्यकर्ते आले.

त्यांनी दसरा चौक येथे जमाव जमवून दसरा चौक ते चिंचवड स्टेशनकडे जाणारा रस्ता अडवला. हातातील काळे झेंडे दाखवून ‘फडणवीस गो बॅक, भाजपा सरकार हाय हाय, काँग्रेस पक्षाचा विजय असो अशा घोषणा दिल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांनी बेकायदेशीर जमाव जमवून घोषणाबाजी करून निदर्शने केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पिंपरी पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button