पिंपरी / चिंचवड

बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

पिंपरी l प्रतिनिधी

भरधाव बसच्या धडकेत दुचाकीवरून जाणा-या ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना 20 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता तळवडे येथील कॅप जेमिनी कंपनी जवळ घडली.

पांडुरंग दत्तात्रय कोकाटे (वय 60, रा. सुतारवाडी, पाषाण) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. याप्रकरणी निखिल पांडुरंग कोकाटे (वय 31, रा. सुतारवाडी, पाषाण) यांनी देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार बस (एम एच 12 / के जी 1922) चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे वडील मयत पांडुरंग कोकाटे हे 20 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता त्यांच्या घरून चाकणकडे जात होते. तळवडे परिसरात कॅनबे चौकाच्या पुढे कॅप जेमिनी कंपनी जवळ रस्त्याच्या वळणावर आरोपी बस चालकाने कोकाटे यांच्या दुचाकीला बसचा धक्का दिला. त्यात कोकाटे हे गंभीर जखमी झाले. त्यातच त्यांचा मृत्यू झाला. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button