पिंपरी / चिंचवड

पिस्तुल बाळगल्या प्रकरणी दोघांना अटक

पिंपरी l प्रतिनिधी

बेकायदेशीरपणे पिस्तुल बाळगल्या प्रकरणी पिंपरी चिंचवड गुन्हे शाखा युनिट चारने दोघांना अटक केली. अटक केलेल्या आरोपींकडून एक पिस्टल आणि एक जिवंत कडतुस जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 8) दुपारी पिंपळे निलख येथे करण्यात आली.

कुणाल सुदेश साठे (वय 25, रा. पिंपळे निलख गावठाण, पुणे), प्रदीप बाळासाहेब सांडभोर (वय 21, रा. नेहरूनगर, पिंपरी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई प्रशांत सैद यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपळे निलख येथे रक्षक चौक ते पिंपळे निलख या रस्त्यावर दोघेजण संशयितरित्या थांबले असून त्यांच्याकडे पिस्तुल आहे, अशी माहिती गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून कुणाल आणि प्रदीप या दोघांना ताब्यात घेतले. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे 50 हजारांचे एक देशी पिस्टल आणि एक हजार रुपये किमतीचे एक जिवंत कडतुस आढळून आले. पोलिसांनी पिस्तुल आणि कडतुस जप्त करत आरोपींना अटक केली. सहाय्यक पोलीस निरीक्षक अंबरीश देशमुख तपास करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button