ताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्रराजकारण

“अडीच लाख घरं, दहा लाख मतदार आणि दहा हजार कार्यकर्ते”

पुणे लोकसभा जिंकण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी सांगितली व्युहरचना

 पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीत महायुतीकडून भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली आहे. यातच पुणे लोकसभेसह जिल्ह्यातील सर्व लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे जबाबदारी देण्यात आलीय. यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे हात बळकट करण्यासाठी आणि मुरलीधर मोहोळ यांना विजयी करण्यासाठी चंद्रकांत पाटलांनी भाजपची व्युहरचना आज पत्रकारांशी बोलतांना सांगितली आहे. मतदारांच्या घरी प्रत्यक्ष जाण्यासाठी भाजपने मोठी योजना आखली आहेत. त्याबाबत ते बोलत होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की,  प्रत्येक घरी चार मतदार असतील तर दहा लाख मतदाराला एका दिवशी संपर्क करण्याची महत्वकांक्षी योजना आखली आहे. ती व्यवहारात आणणं ही प्रत्येकाची जबाबदारी असून आजच मी श्याम देशपांडे यांच्या घरी गेलो.  श्याम देशपांडे यांनी अगोदरच पंचवीश घरांना भेटी दिल्या आहेत.  माझ्यासह मुरलीधर मोहोळ देखील २५ घरांना भेटी देणार आहेत. अडीच लाख घरं, दहा लाख मतदार आणि दहा हजार कार्यकर्ते असा त्याचा रेशीओ असणार आहे.

पुढे बोलतांना चंद्रकांत पाटील म्हणाले की,  निवडणुकीपुर्वी आम्ही संघटनात्मक रचना बांधून घेतली आहे. एकवीशे बुथवर तीस जणांची समिती स्थापन करून प्रत्येकाला एका पानांवरील पाच कुटुंबांची जबाबदारी देण्यात आली आहे.  यातच पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील  सर्वपक्षीय नेत्यांची दोन दोन तांसाच्या बैठका घेतल्या आहेत. ज्याठिकाणी समन्वयकांनी समन्वय साधला पाहिजे. यातच आठ नगरसेवकांचा दोन प्रभाग अशा प्रकारे बैठकाही घेतल्या आहेत. त्यानंतर प्रभागनिहाय बैठक घेऊन त्यालाही मोठी संख्येने लोक उपस्थित होते. यामध्ये  ३३ प्रभाग येतात. त्यामध्ये हजार बाराशे असे समन्वय येतात.  कॉलनी मीटिंग असे सुक्ष्म पद्धतीने नियोजन लोकसभा निवडणुकीसाठी करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

महायुती एकसंघ राहावी यासाठी पुणे जिल्ह्यातील चार लोकसभा मतदारसंघात तसेच पुणे लोकसभेतील सहा विधानसभा मतदारसंघात बैठका घेतल्या. यात काही वाद असेल तर तो दुर करण्याचा प्रयत्न केला. यातच प्लॅक्सवरून ज्या काही काहाण्या समोर येत आहेत. त्यावर सगळ्यांना हात जोडून विनंती केली की आपण महायुतीत आहोत. त्यामुळे याची काळजी सगळ्यांनी घ्यावी.  सहा एप्रिल रोजी हा भाजपचा स्थापना दिवस होता. त्यानंतर भाजपच्या सर्व नेत्यांनी आपापल्या घरी भाजपचा झेंडा लावला आहे. आज रवीवार सोयीचा म्हणून भाजपच्या दहा हजार कार्यकर्त्यांनी प्रत्येकी २५ घरं केल्याशिवाय घरी जायचं नाही. असेही कार्यकर्त्यांना सुचना दिल्याचे चंद्रकांत पाटलांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button