breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

चंद्रकांत पाटील यांनी संपत्ती,गुन्हे लपवले; न्यायालयाचे चौकशीचे आदेश

पुणे |महाईन्यूज|

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पुणेन्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. विधानसभा निवडणुकांवेळी प्रतिज्ञापत्र दाखल करताना संपत्ती आणि दाखल गुन्ह्याबाबत माहिती लपवल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात दाखल केलेल्या तक्रारीची चौकशी करण्याचे आदेश प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी जे. एस. केळकर यांनी दिले आहेत. चौकशी झाल्यानंतर १६ सप्टेंबरपर्यत त्याबाबतचा अहवाल न्यायालयात सादर करावा, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

चंद्रकांत पाटील हे कोथरूड विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. निवडणुक लढण्यापूर्वी संपत्ती आणि स्वतःवर दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते. मात्र या प्रतिज्ञापत्रात त्यांनी जाणूनबुजून ते मालक असलेल्या दोन कंपन्यांची माहिती
लपविली असल्याचा आरोप करीत कोथरूड येथील व्यवसायिक डॉ. अभिषेक हरिदास यांनी न्यायालयात तक्रार दाखल केली आहे.

तसेच त्यांनी २०१६ ते २०१९दरम्यान उत्पन्नाच्या स्रोतबाबत खोटी माहिती दिली असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे. २०१२ साली कोल्हापूरमधील राजारामपुरी पोलिस ठाण्यात त्यांच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यात दोषारोपपत्र सादर झालेले असताना ते अद्याप सादर झालेले नाही, अशी माहिती प्रतिज्ञापत्रात दिली असल्याची तक्रार डॉ. हरिदास यांनी न्यायालयात केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरोधात खटला चालून त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी तक्रारीद्वारे करण्यात आली आहे.तक्रारीची दखल घेत पोलिसांनी याबाबत चौकशी करावी, असे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button