breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

नारायण राणे अटक प्रकरणात सत्याचा विजय झाला : चंद्रकांत पाटील

पुणे । प्रतिनिधी

महाराष्ट्रात काल दिवसभर सुरू असलेला राजकीय खेळ सूडबुद्धीने झालेला असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. न्यायालयात राज्य सरकारने मांडलेला कोणताही मुद्दा टिकला नाही. या कारणाने मा. नारायणराव राणे जी यांना न्यायालयाने पूर्णपणे जामीन दिला. यातून हेच दिसून येते की, सत्याचा विजय झाला, अशी प्रतिक्रिया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली.

गेल्या २० महिन्यात एखाद्या कार्यकर्त्याला किंवा नेत्याला अडकवणारी राज्य सरकारची एकही गोष्ट न्यायालयात टिकली नाही.न्यायालयाकडूनच प्रत्येक वेळी सरकारला चपराक बसली आहे. अनपेक्षितपणे मिळालेल्या सत्तेचा दुरुपयोग केल्यामुळे सरकारविरुद्ध न्यायालयाने दर वेळेस योग्य तोच निकाल दिला आहे.

राज्य सरकार फार घाबरट आहे. रात्री १२ वाजल्यापासून सिंधुदुर्गात त्यांनी संचारबंदी लावली. संपूर्ण महाराष्ट्र पेटला असताना केवळ सिंधुदुर्गात संचारबंदी का?राणे जी यांच्या यात्रेला मुंबईत उदंड प्रतिसाद मिळाला.पोपटाचा प्राणही मुंबई महानगरपालिकेत आहे.ती हरली तर काय राहणार यांच्याकडे? कायदा व सुव्यवस्थेवर होणारा परिणाम ही आमची जबाबदारी नाही. टाळी एका हाताने वाजत नाही. ज्यावेळी शेकडो लोकं राणे जी यांच्या घरासमोर जमा होतात, तेव्हा कायदा व सुव्यवस्था कुठे असते ? राणे जी यांचे घर फोडायला गेलेल्या लोकांचे मुख्यमंत्री अभिनंदन करतात, हेच दुर्दैव आहे, असेही पाटील यांनी म्हटले आहे.

भाजपा कधीही मनामध्ये राग ठेऊन कोणतेही काम करत नाही. मा. राणे जी यांच्यासोबत जो अमानवीय प्रकार घडला, त्यामुळे त्यांची तब्येतसुद्धा बिघडली. त्यांना अटक केल्यानंतर कोणतेही वैद्यकीय उपचार वेळेवर दिले गेले नाहीत. त्यांची तब्येत ठीक झाल्यानंतर जन आशिर्वाद यात्रा पुन्हा सुरू होईल, असा दावाही पाटील यांनी केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button