breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहरात नागरिक करताहेत मिळकतकर चुकवेगिरी, आयुक्तांनी दिले सर्व्हेक्षणाचे आदेश

नागरिकांनो… पंधरा दिवसात मालमत्तेची नोंद करण्याचे आवाहन

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिक मिळकतकरांची चुकवेगिरी करु लागले आहेत. यामुळे महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याऐवजी घट होवू लागली आहे. त्यामुळे शहरातील मालमत्तेचे शंभर टक्के सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. येत्या पंधरा दिवसात मालमत्तेच्या नोंदणीला सुरुवात करण्यात येईल, त्याला नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी पत्रकारांशी बोलताना केले. 

आयुक्त हर्डिकर म्हणाले की,  पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील सुमारे 5 लाख 3 हजार मालमत्तेची नोंदणी आहे. मात्र, शहरात अनेक नागरिक पालिकेच्या सोयी-सुविधाचा फायदा घेवूनही अनधिकृतपणे बांधकामे केली आहेत. हजारो नागरिकांनी बांधकामाची नोंदणी न करणे तसेच वाढीव बांधकाम लपविलेली आहेत. त्या बांधकामांची महापालिकेकडे नोंदणी नसल्याने मिळकतकरांची चुकवेगिरी होवू लागल्याचे निर्दशनास आले आहे. यामुळे अधिकृतपणे त्या मालमत्तेची पंधरा दिवसात नोंद करावी, थकबाकीदारांसाठी मिळकतकर वसुलीसाठी विशेष मोहिम हाती घेतलेली आहे. त्यांच्या वसुलीसाठी विशेष पथके तयार केली आहेत.

प्राथमिक टप्प्यात महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 22 मधील काळेवाडी-थेरगाव परिसरात मालमत्तेचे सर्व्हेक्षण मोहीम हाती घेतली आहे. नागरिकांनी स्वताहून त्यांच्या बांधकामाची नोंदणी करावी, कोर्ट केसेसमुळे अनेक मालमत्तेच्या मिळकत करांची वसुली वर्षानुवर्षे थकबाकी आहे.याबाबत वकीलांची बैठक घेतली असून कोर्टातील केसेस निर्गत करण्याचा प्रयत्न केला जाईल.

दरम्यान, तत्कालीन आयुक्त श्रीकर परदेशी यांनी सन 2013 मध्ये महापालिकेच्या हद्दीतील मालमत्तेचे सर्व्हेक्षण केले होते. त्यावेळी 81 हजार नोंदणी नसलेल्या मिळकती आढळून आल्या होत्या. त्यातील सर्वच मिळकतीच्या नोंदणी पुर्ण झाली आहे. परंतू, काही मालमत्तेचे जागा मालक आढळून येत नसल्याने 5 टक्के मिळकतीच्या नोंदी अद्याप बाकी आहेत.

 

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button