breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘राज ठाकरेंवर कमेंट कराल तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करू!’ राष्ट्रवादीच्या नेत्याला धमकी

अमोल मिटकरी यांनी ट्वीट करत दिली माहिती

मुंबई : राष्ट्रवादीचे प्रवक्ता तथा विधान परिषदेतील आमदार अमोल मिटकरी यांना राज ठाकरेंवर कमेंट कराल तर तुमचा करेक्ट कार्यक्रम करू, अशा प्रकारची धमकी १ एप्रिल रोजी व्हॉट्सअपवर मिळाली आहे. या प्रकारानंतर मिटकरी यांनी स्थानिक पोलिस स्टेशनला तक्रार दाखल करून माझ्या व कुटूंबियांच्या जीवाला धोका असल्याचे म्हटले आहे.

१ एप्रिल रोजी संध्याकाळी मिटकरी यांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्यांना शनिवारी (१ एप्रिल) सकाळी १०.३० वाजता व्हॉट्स्अपवर एक मॅसेज आला. त्यामध्ये एका व्यक्तीने धमकी दिली. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे यांच्यावर वक्तव्य करताना जरा सांभाळून करा, नाहीतर करेक्ट कार्यक्रम करू असा उल्लेख केला आहे. या प्रकारातून मला व माझ्या कुटूंबियांच्या जीवाला धोका आहे. याबाबत पोलिसांनी तातडीने चौकशी करून संबधितांविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करावी अशी विनंती केली आहे.

अमोल मिटकरी यांनी ट्विट केलं आहे. मत नसलेल्या सेनेच्या एका टुकार कार्यकर्त्याने आज मला करेक्ट कार्यक्रम करण्याची धमकी दिली.राज्यातील जात्यांध परिस्थिती पाहता सुरक्षेच्या दृष्टीने मी सिविल लाईन पो. स्टेशन अकोला या ठिकाणी तक्रार गुन्हा दाखल झाला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणात दखल घेत आरोपीस तत्काळ अटक करावी, असं अमोल मिटकरी यांनी ट्विट करत म्हटलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button