TOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

ट्रायोज व झुलेलाल टॉवर्स सोसायटीचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावणार : माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे

पिंपरी: पिंपळे सौदागरमधील ट्रायोज व झुलेलाल टॉवर्स सोसायटी रस्त्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावणे ही प्रथम प्राथमिकता असल्याचे मत माजी नगरसेवक शत्रुघ्न काटे यांनी व्यक्त केले आहे.

शत्रुघ्न काटे यांच्या सतत पाठपुराव्यामुळे पिंपळे सौदागर परिसरातील ट्रायोज आणि झुलेलाल टॉवर्स येथील रस्त्याचे ग्राऊंटिंगच्या कामास सुरुवात करण्यात आली आहे. ट्रायोज आणि झुलेलाल टॉवर्स या सोसायटी मधील राहिवासीयांनी शत्रुघ्न काटे यांच्याकडे या रस्त्याच्या दुरावस्था बाबत तक्रार केली होती. याची दखल घेत शत्रुघ्न काटे यांनी तातडीने स्थापत्य विभागला सूचना देत सदर रस्त्याच्या ग्राऊंटिंगचे काम सुरू करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
या रस्त्याची दुरवस्था दूर करून लवकरात लवकर या रस्त्याचे डांबरीकरण करणे ही सर्वात प्राथमिक बाब असल्याचे शत्रुघ्न काटे यांनी सांगितले. तसेच शत्रुघ्न काटे यांच्या पुढाकाराने या रस्त्याच्या कामास सुरुवात झाल्याने ट्रायोज आणि झुलेलाल टॉवर्स सोसायटी राहिवासी यांनी समाधान व्यक्त केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button