breaking-newsताज्या घडामोडीपुणे

‘तळजाई’वरील झाडांसाठी शुद्ध केलेले सांडपाणी वापरा

  • खासदार सुप्रिया सुळेंची महापालिका आयुक्तांकडे मागणी

पुणे – तळजाई टेकडीवरील वनसंपदेत शेकडो प्रकारचे वृक्ष आहेत. यासाठी विठ्ठलवाडी येथील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी प्रक्रिया करुन वापरता येईल. त्यासाठी तळजाई पठारावर प्रकल्प उभारणी करणासाठी आवश्‍यक ती तरतूद करावी, अशी सूचना राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी ही सूचना केली. त्यानुसार नगरसेवक सुभाष जगताप आणि माजी नगरसेवक विकास दांगट यांनी महापालिकेत आज पालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन याबाबत मागणीचे सविस्तर निवेदन दिले. तळजाई टेकडीवरील पर्वती पाचगाव हे वनक्षेत्र असले, तरी ते शहलगत असल्याने आणि त्याठिकाणी तळजाई देवीचे मंदिर असल्याने रोज हजारो पुणेकर या टेकडीवर जातात. सकाळच्या वेळी फिरायला जाणाऱ्यांसाठी तेथे जॉगिंग ट्रॅकसुद्धा आहे.

त्याचवेळी येथील झाडे जगावीत, यासाठी मात्र फारशा उपाययोजना नाहीत. त्यामुळे विठ्ठलवाडी येथील मैलापाणी शुद्धीकरण प्रकल्पातील पाणी तळजाई टेकडीवरील झाडांसाठी वापरता येईल, अशी सूचना खासदार सुळे यांनी मांडली आहे. येथील पाणी शुद्ध करून ते झाडांना दिल्यास हे वनक्षेत्र बारमाही हिरवे राहून पर्यटक संख्या आणखी वाढण्यास मदत होईल, असे त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button