TOP Newsविदर्भ

नागपूर : ‘आपली बस’च्या ताफ्यात १७ ई-बस

  • नागपूरमधील नागरिकांसाठी ‘आपली बस’तर्फे विविध सुविधांचे लोकार्पण

  • केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण

नागपूर । महान्यूज । विशेष प्रतिनिधी ।
गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महापालिकेच्या परिवहन विभागाच्या ‘आपली बस’च्या ताफ्यात दाखल होणाऱ्या १७ ई आणि डिजिटल बसचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. . अमृत महोत्सवी स्वातंत्र्यदिनानिमित्त नागपूरमधील नागरिकांसाठी ‘आपली बस’तर्फे देण्यात आलेल्या विशेष सुविधांतर्गत १७ इलेक्ट्रिक बस तसंच डिजिटल बस सेवेचं लोकार्पण करण्यात आले.

https://mahaenews.com/nagpur-17-e-buses-in-the-fleet-of-aapli-bus/

गेल्या अनेक दिवसांपासून शहरात इलेक्ट्रीक बस दाखल झाल्या आहेत. मात्र, त्याची सुरुवात करण्यात आली नव्हती. एकूण ४० बसेस पैकी १७ बसेस शहरात दाखल झाल्यानंतर सोमवारी संविधान चौकात सायंकाळी ६ वाजता नागरिकांच्या सुविधेसाठी ई आणि डिजिटल बसचे लोकार्पण करण्यात आले.

सदर लोकार्पण सोहळ्यानिमित्त परिवहन विभागाचे प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, आमदार नागो गाणार, चंद्रशेखर बावनकुळे, प्रवीण दटके, अभिजीत वंजारी, डॉ. नितीन राऊत, कृष्णा खोपडे यांनी प्रामुख्याने उपस्थिती दर्शविली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button