Breaking-newsTOP News । महत्त्वाची बातमीताज्या घडामोडीपुणे

बीट मार्शलला इनोव्हा कारने उडवले, पोलिसाचा जागीच मृत्यू

पुणे : कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघात ताजा असताना मुंबईतील वरळीत हिट अँड रन प्रकरण घडले होते, ज्यात एका महिलेचा मृत्यू झाला होता. आता पुण्यातील बोपोडी भागात एक हिट अँड रन प्रकरण घडल्याने शहर पुन्हा हादरले आहे.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर बोपोडी परिसरात रविवारी मध्यरात्री दोन दुचाकीवरील पोलीस बीट मार्शलला इनोव्हा कारने उडवले. या अपघातात एका पोलिसाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाला. जखमी पोलिसावर पुण्यातल्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

या दुर्घटनेने शहरातील पोलिस दलात हळहळ निर्माण झाली आहे. अपघातानंतर वाहन चालक पळून गेला असून, त्याचा शोध घेण्यासाठी पोलिस तपास करीत आहेत. पुण्यात हिट अँड रन प्रकरणे वाढत असल्याने शहरातील नागरिकांमध्ये चिंतेची भावना वाढली आहे.

शहरातील हिट अँड रन प्रकरणांमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे पोलिस दलात अस्वस्थता आहे आणि या प्रकरणाचा तपास लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी होत आहे. पुण्यातील नागरिकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून सुरक्षितता राखावी अशी विनंती पोलिसांनी केली आहे.

Job AlertJob Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button